ओडिशा रेल्वे अपघात! CBI कडून तीन अभियंत्यांना अटक; २९० प्रवाशांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 06:44 PM2023-07-07T18:44:50+5:302023-07-07T18:45:16+5:30

 Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं.

 CBI has arrested senior section engineer Arun Kumar Mohanta, section engineer Mohammad Amir Khan & technician Pappu Kumar in connection with the Odisha train accident  | ओडिशा रेल्वे अपघात! CBI कडून तीन अभियंत्यांना अटक; २९० प्रवाशांचा झाला होता मृत्यू

ओडिशा रेल्वे अपघात! CBI कडून तीन अभियंत्यांना अटक; २९० प्रवाशांचा झाला होता मृत्यू

googlenewsNext

मागील महिन्याची सुरूवात एका वाईट अपघाताने झाली होती. ओडिशात २ जून रोजी झालेला रेल्वेअपघात म्हणजे एक वाईट स्वप्नच. या भीषण अपघाताने अनेकांना पोरकं केलं, काहींनी आपले नातेवाईक गमावले, कोण अनाथ झाला तर कोणाच्या डोक्यावरचं 'बाप' नावाचं छत्र हरपलं. २९० जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लक्षणीय बाब म्हणजे या अपघातानंतर सीबीआयने तीन अभियंत्यांना अटक केली आहे.

सीबीआयने ३०४ आणि २०१ सीआरपीसी अंतर्गत वरिष्ठ विभाग अभियंता अरुण कुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि पप्पू कुमार यांना अटक केली आहे.

ओडिशा रेल्वे अपघातानं अवघ्या जगाचे लक्ष वेधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली होती. तसेच रूग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पाच दिवस घटनास्थळी तळ टोकून होते.

२९० जणांचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. 

Web Title:  CBI has arrested senior section engineer Arun Kumar Mohanta, section engineer Mohammad Amir Khan & technician Pappu Kumar in connection with the Odisha train accident 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.