शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सात बँकांची फसवणूक, रोटोमॅकच्या विक्रम कोठारींनी थकविली ३,७०० कोटींची कर्जे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 9:11 PM

विक्रम कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी सात सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ३,७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली असल्याचे उघड झाले असून केंद्रीय गुन्तचर विभागाने (सीबीआय) यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला

नवी दिल्ली: रोटोमॅक पेन्सचे उत्पादन करणा-या रोटोमॅक ग्लोबल प्रा. लि. या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी सात सरकारी बँकांकडून घेतलेली सुमारे ३,७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली असल्याचे उघड झाले असून केंद्रीय गुन्तचर विभागाने (सीबीआय) यासंदर्भात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे  प्रकरण ताजे असतानाच कोठारी यांची ही कर्ज बुडवेगिरी समोर आली आहे.कोठारी यांच्या कंपनीकडील थकित कर्जांचा आकडा ८०० कोटी रुपयांच्या घरात असावा, असा ‘सीबीआय’चा प्राथमिक अंदाज होता. मात्र कागदपत्रांची पाहणी केली असता ही थकित कर्जे सुमारे ३,७०० कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मूळ कर्जांची रक्कम २,९१९ कोटी रुपये आहे. व्याज व दंडासह ती ३,६९५ कोटी रुपये होते, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.कोठारी यांच्या रोटोमॅक ग्लोबल कंपनीने ज्यांची कर्जे बुडविली आहेत त्यांत बँक आॅफ इंडिया. बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स या सात सरकारी बँकांचा समावेश आहे.कोठारी यांनी कंपनीच्या नावे धंद्यासाठी कर्जे घेतली. परंतु प्रत्यक्षात ते पैसे अन्यत्र वळवून त्यांनी बँकांची फसवणूक केली, असा सीबीआयचा दावा असून त्यासंदर्भात कोठारी व त्यांच्या कंपनीविरुद्ध फसवणूक, लबाडी व विश्वासघात यासारखे गुन्हे नोंदवून तपास सुरु केला आहे. याचाच भाग म्हणून सीबीआयने सोमवारी कोठारी यांच्या घरासह कानपूरमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. कोठारी यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांची, त्यांच्या पत्नीची व मुलाची चौकशी सुरु आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते अभिषेक दयाल यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.नीरव मोदी पाठोपाठ विक्रम कोठारी नावाचा आणखी एक उद्योजक बँकांना चुना लावून देशातून फरार झाल्याची बातमी रविवारी पसरली होती. स्वत: कोठारी यांनी त्याचा इन्कार केला. शिवाय सीबीआयने कानपूरमध्ये त्यांची चौकशी केली यानेही कोठारींचे पलायन ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.सीबीआयच्या एफआयआर पाठोपाठ अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) कोठारी व त्यांच्या कंपनीविरुद्ध मनी लॉड्रिंग कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. कोठारी यांनी बँकांकडून घेतलेली कर्जे अन्यत्र वळवून त्यातून बेनामी मालमत्ता व काळा पैसा केला का, याचा तपास केला जात आहे, असे ‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले.घोटाळा नव्हे, थकित कर्जेआपण कोणताही घोटाळा केलेला नाही. माझ्या कंपनीचे प्रकरण हे बँकांमधील थकित कर्जांचे आहे. बँकांनी माझ्या कंपनीला कर्जबुडवे घोषित केलेले नाही तर आमची कर्जे ‘एनपीए’ खात्यांत टाकली आहेत. त्याचे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रॅब्युनलमध्ये प्रलंबित आहे. मी कर्जे घेतली आहेत व त्यांची मी लवकरच परतफेड करीन, असे निवेदन विक्रम कोठारी यांनी प्रसिद्धीस दिले.