शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

Car Rammed : दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत कार घुसली, एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 9:50 AM

Car Rammed Into People during Durga Idol Immersion Procession : उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

भोपाळ : छत्तीसगडच्या जशपूरनंतर आता मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये (Bhopal)धक्कादायक घटना घडली आहे. येथील बाजारिया पोलीस स्टेशन परिसरातील एका माथेफिरू तरुणाने भरधाव वेगाने कार दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत (Durga Mata Immersion Procession) घुसवली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या मिरवणुकीत लहान मुले, वयोवृद्ध आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या. उपस्थित लोकांनी कार चालकाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो पळून गेला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. उपस्थित लोक संतापल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. यावर पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण, संतप्त लोकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांच्या या कारवाईनंतर वातावरण अधिकच तापले.

शनिवारी रात्री 11:15 वाजता भाविक दुर्गा विसर्जनासाठी स्टेशन परिसर बाजारिया येथे जात होते. इतक्यात मागून एक भरधाव कार मिरवणुकीत घुसली. यामुळे झालेल्या धावपळीनंतर कार मागे घेऊन चालकाने पळ काढला. यानंतर उपस्थित जमावाने गोंधळ सुरू केला. दुसरीकडे, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, यामुळे भाविकांनी पोलीस स्टेशन बाजारियासमोर चक्काजाम आंदोलन केले.

भोपाळचे डीआयजी इर्शाद वली यांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी विसर्जन मिरवणूक स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या समोरून जात होती, यावेळी चांदबार बाजूने वेगाने येणारी कार लोकांना धडक देत मिरवणुकीत घुसली. जोपर्यंत लोकांना काही समजत नाही तोपर्यंत कार चालकाने वेगाने कार मागे घेत तेथून पळ काढला. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत.

जशपूरमध्ये कारने अनेकांना उडवलेदोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरून जात असलेल्या दुर्गा माते मिरवणुकीत कार घुसल्याने 4 जणांचा मृत्यू झाला, तर वीसहून अधिक जण जखमी झाले. कार अचानक मिरवणुकीत घुसल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. उपस्थित लोक संतापल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. उपस्थितांनी लोकांना चिरडणारी कार पेटवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकासह दोघांना अटक केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश