"प्रेमावर विश्वास ठेवता येत नाही असं म्हणायला लागतंय"; ग्रीष्माला फाशीची शिक्षा दिल्यावर कोर्टाची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:16 IST2025-01-21T11:50:49+5:302025-01-21T12:16:28+5:30
केरळमध्ये गाजलेल्या शेरॉन राज हत्या प्रकरणात कोर्टाने मुख्य आरोपी ग्रीष्मा हिला फाशीची शिक्षा सुनावली.

"प्रेमावर विश्वास ठेवता येत नाही असं म्हणायला लागतंय"; ग्रीष्माला फाशीची शिक्षा दिल्यावर कोर्टाची टिप्पणी
Sheron Raj Murder Case: शेरोन राज हत्याकांडातील दोषी ग्रीष्माला केरळन्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. २३ वर्षीय शेरॉन राजला विष देऊन मारल्याप्रकरणी तिला दोषी ठरवण्यात आलं होतं. ऑक्टोबर २०२२ मध्ये तिरुवनंतपुरममध्ये अवयव निकामी झाल्यामुळे शेरॉनचा मृत्यू झाला. नंतर तपासात उघड झाले की त्याची प्रेयसी ग्रीष्माने त्याला विष दिले होते. नेयट्टिनकारा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने म्हटलं की, ती सुधारण्याच्या पलीकडे आहे कारण तिने पीडिताला दुःख देण्याचा सक्रियपणे प्रयत्न केला तसेच मृत्यूपूर्वी अत्यंत वेदना देण्यासाठी योजना आखली होती.
ग्रीष्माने प्रेमसंबंधातून बाहेर पडण्यासाठी त्याचा खून करण्याचा कट रचला आणि त्याला तणनाशकाने भरलेले आयुर्वेदिक मिश्रण दिले. तिचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी होणार असल्यामुळे आणि शेरोन त्या नात्यापासून मागे हटत नसल्याने तिने हे केले. शेरोनला ११ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्याला तीव्र वेदना होत होत्या आणि त्याचे अवयव एकामागून एक निकामी होत होते. मरण्यापूर्वी त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की तो ग्रीष्माच्या घरी गेला होता आणि तिथे त्याला प्यायला औषध दिले होते.
"ग्रीश्माने शेरोनला इंचाने इंचाने मारले"
ही सध्याच्या गुन्ह्यासारखीच मोडस ऑपरेंडी होती. आरोपीने रसात पॅरासिटामॉल मिसळून खून करण्याचा प्रयत्न होता, असा निष्कर्ष काढता येईल. क्रूर मानसिकता असलेली महिलाच प्रियकरासोबत असा गुन्हा करू शकते आणि त्यामुळे ती दयेची पात्र नाही. या हत्येमुळे समाजात एक संदेश गेला आहे की एक मुलगी तिच्या प्रियकराचे नाते तोडल्यानंतर सहजपणे त्याची हत्या करू शकते. यामुळे प्रेमी आणि मित्रांमध्ये भीती निर्माण झाली आहे, असं कोर्टानं म्हटलं.
"यामुळे असा संदेश गेलाय की प्रियकरावर विश्वास ठेवता येत नाही. आजकाल तरुणाई लिव्ह इन रिलेशनशिपचा वापर करत आहे. जर ते हलक्यात घेतले तर ते वापरणे आणि फेकून देण्यासारखे आहे. त्यामुळे कोणीही आपल्या जोडीदाराला सहजपणे लक्ष्य करू शकतो. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातोय," असं न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटलं.
दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२२ ग्रीष्माने शेरॉनला तिच्या कन्याकुमारी येथील रामवर्मनचिराई येथील घरी बोलावले होते. ग्रीष्माने शेरॉनला एक आयुर्वेदिक टॉनिक प्यायला दिले. शेरॉनने ते प्यायले. घरातून बाहेर पडल्यानंतर शेरॉनला उलट्या होऊ लागल्या. शेरॉनच्या पालकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण त्यांची प्रकृती खालावत गेली. त्याच्या आई-वडिलांना ग्रिष्माकडून जाणून घ्यायचे होते की तिने शेरॉनला नेमके काय खायला दिले होते. पण तिने हे सत्य लपवून ठेवले. त्यामुळे उशीर झाला आणि शेरॉनला जीव गमवावा लागला.