राज्यात रेल्वे तिकीट रद्द करणार, जिल्हाबंदीचा फटका; आंतरराज्यीय प्रवास मात्र सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:59 IST2020-05-22T03:50:28+5:302020-05-22T05:59:50+5:30
महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे.

राज्यात रेल्वे तिकीट रद्द करणार, जिल्हाबंदीचा फटका; आंतरराज्यीय प्रवास मात्र सुरू
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. यामुळे येत्या १ जूनपासून प्रवास करणाºया महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल. परंतु राज्यातील दुसºया जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.
महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाला तिकिटे रद्द करावी लागत आहेत. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याचे कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सुटणाºया किंवा महाराष्ट्रातील शहरात थांबा असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत आहे. याचा परिणाम अन्य राज्यात जाणाºया प्रवाशांवर होणार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले. महाराष्टातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे बुकिंग करू शकतात.
ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत केली जाणार असून तसे प्रवाशांना एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे.
-रेल्वेच्या तिकीट खिडक्या शुक्रवार, २२ मे पासून पुन्हा उघडतील. तेथून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. प्रत्येक स्थानकावर त्यासाठी सुरक्षित अंतराची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर खिडक्यांची संख्या वाढवली जाईल. तिकीट काढताना अंतराचा नियम पाळावा लागेल.