मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:50 IST2025-08-07T17:50:05+5:302025-08-07T17:50:32+5:30
Rajasthan Crime News: आता अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीसारख्या गुन्ह्यांच्या अनेक घटना चित्रीत होत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील अलवर येथे अशीच एक चोरीची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्य़े चित्रित झाली आहे.

मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
आता अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीसारख्या गुन्ह्यांच्या अनेक घटना चित्रीत होत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील अलवर येथे अशीच एक चोरीची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्य़े चित्रित झाली आहे. येथील मंदिरात एक चोर आला. त्याने शिवशंकराच्या पिंडीसमोर नतमस्तक होत हात जोडले. मग पिंडीवर जल अर्पण केले. त्यानंतर संधीचा फायदा घेत तिथली तांब्याची भांडी चोरली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना अलवर शहरातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या एका चौकात असलेल्या प्रचंड महादेव मंदिरात घडली आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर चोर मंदिरात पोहोचला. त्याने देवासमोर हात जोडले. शिवशंकराच्या पिंडीवर जल अर्पण केले. त्यानंतर त्याने मंदिरात असलेली तांब्याची भांडी चोरली आणि तिथून पसार झाला.
आता पोलिसांना या अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले की, दोन महिन्यांमध्ये मंदिरात तीन वेळा चोरीची घटना घडली आहे. सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे मंदिरात कॅमेरे लावण्यात आले होते. त्याच कॅमेऱ्यांमध्ये आता चोरीची ही घटना चित्रित झाली आहे. आता पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने चोराचा शोध सुरू केला आहे.