कोलकाता पोलिसांचा पलटवार; सीबीआयच्या हंगामी संचालकांच्या पत्नीच्या कंपनीवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 07:30 PM2019-02-08T19:30:37+5:302019-02-08T19:33:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील जलपाईगुडी येथील आजच्या सभेमध्ये ममता बॅनर्जींवर आरोप करताना माटीला बदनाम केले तर मानुषला मजबूर केल्याचा आरोप केला होता.

Calcutta Police Counter; raid on CBI's interim directors wife's company | कोलकाता पोलिसांचा पलटवार; सीबीआयच्या हंगामी संचालकांच्या पत्नीच्या कंपनीवर छापा

कोलकाता पोलिसांचा पलटवार; सीबीआयच्या हंगामी संचालकांच्या पत्नीच्या कंपनीवर छापा

Next

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरोधात पोलिस यांच्यामधील तणाव काही निवळायचे नाव घेत नाहीय. कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी शिलाँगला दाखल झालेले असताना पोलिसांनी सीबीआयच्या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले आहेत. 
कोलकाता येथील माजी सीबीआय संचालकांच्या घरावर आणि सीबीआयचे अंतरिम संचालक एम नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या कंपनीवर हे छापे मारण्यात आले आहेत. नागेश्वर राव यांच्या पत्नीची अँजेलिना मर्कंटाईल प्रा. लि. नावाची सॉल्ट लेक येथे कंपनी आहे. कोलकाता पोलिसांच्या य़ा छाप्यामुळे उद्या होणाऱ्या राजीव कुमार यांच्या चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 




दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील जलपाईगुडी येथील आजच्या सभेमध्ये ममता बॅनर्जींवर आरोप करताना माटीला बदनाम केले तर मानुषला मजबूर केल्याचा आरोप केला होता. तसेच पश्चिम बंगालची नवी ओळख दंगेखोर आणि लोकशाही विरोधी बनविल्याचाही आरोप केला होता. मुख्यमंत्री जरी दीदी असल्या तरी दादागिरी भलत्यांचीच सुरु आहे. दलालांनी तृणमूलचे सरकार हाती घेतल्याचा आरोप केला होता. 



 

यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेमध्ये मोदींवर टीका केली. निवडणुका आल्या की मोदी चायवाले बनतात आणि संपल्याकी राफेलवाले बनतात, अशी खोचक टीका त्यांनी केली. 


Web Title: Calcutta Police Counter; raid on CBI's interim directors wife's company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.