शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

व्यापमं घोटाळा : काँग्रेसचा आरोप उमा भारतींचे मौन

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

उज्जैन (म.प्र.)- मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात तपास संस्थांकडून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना जास्तीतजास्त गोवण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल काँग्रेसच्या आरोपावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास खुद्द भारती यांनी मंगळवारी नकार दिला.

उज्जैन (म.प्र.)- मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यात तपास संस्थांकडून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांना जास्तीतजास्त गोवण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल काँग्रेसच्या आरोपावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास खुद्द भारती यांनी मंगळवारी नकार दिला.
शिवरात्री उत्सवानिमित्त येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या जलस्रोत व नदी विकास मंत्री उमा भारती यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा या मुद्यावर आपण तूर्तास काहीही बोलणार नाही. योग्य वेळी पत्रकाद्वारे संपूर्ण चित्र स्पष्ट करू असे त्यांंनी सांगितले. पत्रक केव्हा काढणार? असे विचारले असता लवकरच असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी या घोटाळ्यावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यावर कडाडून हल्ला चढविताना मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बचाव करण्यासाठी मूळ एक्सेल शीटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. तपास संस्थांनी भारती यांची भूमिका नाहक वाढवून चढवून दाखविली, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांचे म्हणणे होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मूळ एक्सेल शीटमध्ये उमा भारती यांच्या नावाचा उल्लेख १० वेळा होता. परंतु शीटसोबत छेडछाड करून तो १७ वेळा करण्यात आला, असा दावा या नेत्यांनी केला आहे. भारती यांची प्रतिमा मलीन करण्यासाठीच असे करण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे होते. राज्यातील भाजपाच्या राजकारणात मुख्यमंत्री चौहान आणि उमा भारती हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. (वृत्तसंस्था)