प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 09:29 IST2025-06-26T09:29:01+5:302025-06-26T09:29:45+5:30

Accident In Uttarakhand: उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे.

Bus full of passengers falls into flooded alaknanda river, horrific accident in Uttarakhand | प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे आज सकाळी प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.

या अपघाताबाबत माहिती देताना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त वाहन हे टेम्पो ट्रॅव्हलर असण्याची शक्यता आहे. ही गाडी प्रवाशांना घेऊन जात होती. तसेच या गाडीमधून १८ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून, आथापर्यंत पाच ते सात प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश असून, अपघातग्रस्त वाहनामधील १० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title: Bus full of passengers falls into flooded alaknanda river, horrific accident in Uttarakhand