जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू; २० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:49 IST2025-05-06T11:49:13+5:302025-05-06T11:49:24+5:30
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान युद्धावरून सध्या तणावाचे वातावरण आहे. तरीदेखील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांवर जात आहेत. अशातच पूंछमध्ये एक ...

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू; २० जखमी
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान युद्धावरून सध्या तणावाचे वातावरण आहे. तरीदेखील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांवर जात आहेत. अशातच पूंछमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होत दरीत कोसळली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील घानी गावाहून मेंढरला ही बस निघाली होती. सकाळी ९.२० च्या सुमारास ही बस मानकोट परिसरातील सांगराजवळन आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बस कठडा ओलांडून खाली दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी रामबन जिल्ह्यात झालेल्या अपघातात लष्करी वाहन दरीत कोसळले होते. ७०० फूट खोल दरीत कोसळल्याने तीन जवान शहीद झाले. लष्कराचा ट्रक जम्मूहून श्रीनगरला राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जात होता. सोबत लष्कराच्या अन्य वाहनांचा ताफा होता. सकाळी ११.३० वाजता बॅटरी चष्माजवळ हा अपघात झाला होता.