रायवरम :आंध्र प्रदेशातील मार्कापूरम जिल्ह्यात गुरुवारी पहाटे खासगी बसने डंपरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला व २२ जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास पोडिली रोडवरील रायवरम गावाजवळ घडली. बसने काँक्रीटच्या चिप्सने भरलेल्या डंपरला धडक दिली. त्याच्या इंधन टाकीवर बस आदळल्याने भीषण आग लागली. त्यावेळी बसमध्ये ४१ प्रवासी होते. त्यापैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही बस हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची असून, तिचा मालक कणिगिरी येथील आहे. ही खासगी बस तेलंगणातील जगित्याल येथून नेल्लोर जिल्ह्यातील कालीगिरीकडे जात होती.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाखांची मदत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. अपघातातील मृतांच्या वासदारांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली.
आंध्र प्रदेशातील मार्कापूरम जिल्ह्यात गुरुवारी झालेला अपघात ही दुःखद घटना आहे असेही मोदी यांनी म्हटले आहे.
पेट्रोलची टाकी व बसच्या बॅटरीने घेतला पेट
या खासगी बसने चुकीच्या लेनमध्ये जाऊन डंपरला धडक दिल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात डंपरमधील काही लोकही जखमी झाले. सदर अपघातात डंपरची पेट्रोल टाकी व बसची बॅटरी या दोघांनीही पेट घेतला. बसचे स्टिअरिंग अडकल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला असून त्याची चौकशी केली जाईल.
Web Summary : A bus collided with a dumper in Andhra Pradesh, killing thirteen and injuring twenty-two. The bus caught fire after the impact. Financial assistance has been announced for victims' families. Preliminary investigations suggest the bus was in the wrong lane.
Web Summary : आंध्र प्रदेश में बस और डंपर की टक्कर में तेरह लोगों की मौत हो गई और बाईस घायल हो गए। टक्कर के बाद बस में आग लग गई। पीड़ितों के परिवारों के लिए वित्तीय सहायता की घोषणा की गई है। प्रारंभिक जांच में पता चला है कि बस गलत लेन में थी।