अहमदाबाद/ नंदुरबार : गुजरात राज्य परिवहन महामंडळाची एक बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळल्याने ३७ प्रवासी ठार, अन्य २४ जखमी झाले. मृतांमध्ये तिघे जण नंदुरबारचे आहेत. दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील सुपा गावाजवळ शुक्रवारी हा भीषण अपघात घडला. नवसारीहून उकाईकडे जात असताना पूर्णा नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटला आणि बस नदीत कोसळली. नदीत आणखी मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. काही या अपघातातील मृतांमध्ये नवापूर (जि. नंदुरबार) येथील एक दाम्पत्य व त्यांची मुलगी, अशा तिघांचा समावेश आहे. मुबिनोद्दीन हफिजोद्दीन शेख (७२), रुकय्या मुबिनोद्दीन शेख (६७) व निकहत शफिकोद्दीन शेख (३५) अशी त्यांची नावे आहेत. (वृत्तसंस्था)
बस नदीत कोसळून ३७ प्रवासी ठार
By admin | Updated: February 6, 2016 02:54 IST