शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

भीषण अपघात! 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात कोसळली; 18 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 11:23 AM

Madhya Pradesh Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली -  मध्‍य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. तब्बल 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात पडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (16 फेब्रुवारी) सकाळी मध्य प्रदेशमध्ये हा अपघात झाला. 54 प्रवाशांनी भरलेली बस ही सिद्धी येथील एका खोल कालव्यात कोसळली. बस सिद्धी येथून सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सात प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. 54 पैकी अनेक प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. 

आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 13 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी

आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. कर्नूल जिल्ह्यातील वेलदुर्ती मंडळाजवळील मदारपूर गावात एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशBus Driverबसचालक