बर्निंग ट्रेन! नवी दिल्लीत एक्स्प्रेसला लागली भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 16:33 IST2019-09-06T16:33:07+5:302019-09-06T16:33:58+5:30

आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.   

Burning Train! At New Delhi railway station Express broke out heavy fire | बर्निंग ट्रेन! नवी दिल्लीत एक्स्प्रेसला लागली भीषण आग 

बर्निंग ट्रेन! नवी दिल्लीत एक्स्प्रेसला लागली भीषण आग 

ठळक मुद्देनवी दिल्ली रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस ट्रेन थांबली होती.  तिच्या पॉवर कारमधून प्रचंड धूर निघू लागला आणि धुराचे रूपांतर भीषण आगीत झाले.

नवी दिल्ली - नवी दिल्लीरेल्वे स्थानकात थांबलेल्या एक्स्प्रेस ट्रेनला आज दुपारी भीषण आग लागली. चंदीगड-कोचिवली एक्स्प्रेसच्या पॉवर कारमध्ये ही भीषण आग लागली. अन्य दोन डब्यांपर्यंत आग पसरल्याने नवी दिल्ली स्थानकात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.   

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस ट्रेन थांबली होती. दरम्यान तिच्या पॉवर कारमधून प्रचंड धूर निघू लागला आणि धुराचे रूपांतर भीषण आगीत झाले. नंतर ही आग एक्स्प्रेसच्या अन्य दोन डब्यांमध्येही पसरली. आगीची माहिती कळताच प्लॅटफॉर्मवर असलेले प्रवासी इतरत्र पळू लागले. या आगीमुळे प्लॅटफॉर्मचे नुकसान झालं आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी वा कोणीही जखमी झालेले नाही. एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Web Title: Burning Train! At New Delhi railway station Express broke out heavy fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.