Bulandshahr Blast: बुलंदशहरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भीषण स्फोट, 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:28 IST2022-03-07T15:27:32+5:302022-03-07T15:28:43+5:30
Bulandshahr Blast: अन्न शिजवताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, यावेळी घटनास्थळावर असलेले सर्वजण जखमी झाले.

Bulandshahr Blast: बुलंदशहरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भीषण स्फोट, 10 विद्यार्थ्यांसह 13 जण भाजले
बुलंदशहर:उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या अपघातात 10 विद्यार्थ्यांसह 13 जण गंभीररित्या भाजले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना अलीगड उच्च वैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, बुलंदशहरमधील सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अन्न शिजवताना अचानक 5 किलो गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात किचनमध्ये असलेले 13 जण जखमी झाले, त्यातैली 10 जण विद्यार्थी आहेत. सर्व जखमींना तात्काळ घटनास्थळावरुन बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, स्फोटाचा आवाज ऐकून कॉलेज कॅम्पस तसेच आजूबाजूच्या परिसरातील मोठा गोंधळ उडाला.