शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणांना बजेटचा मुहूर्त!

By admin | Updated: September 17, 2014 02:51 IST

सुधारणांची सुरुवात ही पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे संकेत स्वत: केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली : सुधारणा आणि विकासाचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 1क्क् दिवसांचा कालावधी उलटूनही कोणत्याही आर्थिक सुधारणा न केल्याने विविध घटकांतून नाराजीचा सूर आळवण्याची सुरुवात झाली असतानाच, आर्थिक सुधारणांची सुरुवात ही पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे संकेत स्वत: केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. परिणामी, आर्थिक सुधारणांकरिता आणखी किमान पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. 
उपलब्ध माहितीनुसार, 2क्15-16 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून या माध्यमातून आर्थिक सुधारणांची घोषणा करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय वित्तमंत्रलयातील उच्चपदस्थ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय वित्तसचिव अरविंद मायाराम यांनी तीन ते चार विषयाच्या अनुषंगाने सुधारणांच्या धोरणावर काम सुरुवात केली आहे. याची बांधणी करून धोरणात्मक घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केली जाईल. अनुदान कपात, वित्तीय व्यवस्थेचे सशक्तीकरण, प्रशासकीय गतीमानता आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पोषक धोरण या अनुषंगाने आर्थिक सुधारणा कार्यक्रम निश्चित केला जाणार असल्याचे समजते. सुधारणा काय असाव्यात व त्याची अंमलबजावणी कशी अपेक्षित आहे, याकरिता विविध उद्योगसंस्थांकडून सरकारने त्यांची मतेही मागविली आहेत. 
आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम निश्चित करताना अल्प काळात करण्याजोग्या सुधारणा, मध्यमकालीन व दीर्घ कालीन सुधारणा अशा तीन टप्प्यांत याची विभागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, चलनवाढ ही एक मोठी समस्या असून चलनवाढीचा दर हा जगात भारतात सर्वाधिक आहे. त्यामुळे ती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने काम करतानाच याकरिता आवश्यक अशी नवी गुंतवणूक कशी वाढेल व परकीय गुंतवणूक अधिकाधिक कशी येईल, याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी व मंजुरी प्रक्रियेत अडकलेल्या प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याने आर्थिक सुधारणा तूर्तास होणार नसल्याची माहिती नुकतीच रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी न्यूयॉर्क येथे झालेल्या कार्यक्रमात दिली होती.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4आपले पहिले बजेट सादर करताना  वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ‘गुडस् अँड सव्र्हिस टॅक्स’च्या अंमलासाठी लवकरच राज्यांशी समन्वय साधण्याची घोषणा केली होती. 
4या कर प्रणालीचा अंमल लवकर करण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांनी नुकतीच वित्तमंत्र्यांसोबत बैठक घेतली व 2क्16 र्पयत याचा अंमल करण्याचे आदेश दिले.
 
4 पेट्रोलियम व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीद्वारे मिळणा:या कररुपी महसुलाचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याने त्यांना जीएसटीमधून वगळण्याची मागणी अनेक राज्य सरकारांनी केली आहे. या मुद्याच्या अनुषंगाने सध्या जीएसटीचा मुद्दा अडकलेला आहे. त्यामुळे कोणताही घटनात्मक बदल न करता यावर कसा तोडगा काढला जाईल यावर वित्तमंत्रलय सध्या काम करत आहे. मात्र, 2क्16 र्पयत हा लागू करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.