शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: सीतारामन यांच्या नावावर नवा विक्रम; ९१ अर्थसंकल्पांमध्ये कोणालाही जमला नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 16:52 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. त्यांनी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ भाषण केलं. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा कालावधी वाढताना दिसत आहे. दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणाचा कालावधीदेखील जास्त होता. सीतारामन यांनी आज २ तास ३९ मिनिटं भाषण केलं. त्यामुळे सर्वाधिक मोठं अर्थसंकल्पीय भाषण दिल्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला. २००३ मध्ये जसवंत सिंह यांनी अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी त्यांनी २ तास १३ मिनिटं भाषण केलं होतं. जसवंत सिंह यांचा विक्रम निर्मला सीतारामन यांनी मोडीत काढला. गेल्या ७३ वर्षांमध्ये ९१ अर्थसंकल्प सादर झाले. या ७३ वर्षांमधलं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण आज सीतारामन यांना दिलं. मात्र तरीही सीतारामन यांना शेवटची दोन पानं वाचता आली नाहीत. प्रकृती फारशी ठीक नसल्यानं निर्मला यांनी दोन पानं वाचणं टाळलं. सलग दोनवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरल्या. याआधी इंदिरा गांधींनी सलग दोनदा अर्थसंकल्प मांडला आहे. 

सर्वाधिक वेळ भाषण करणारे अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन- २ तास ३९ मिनिटं (२०२०)जसवंत सिंह- २ तास १३ मिनिटं (२००३)अरुण जेटली- २ तास १० मिनिटं (२०१४)निर्मला सीतारामन- २ तास ५ मिनिटं (२०१९)

शब्दांच्या बाबतीत सर्वात मोठं भाषणमनमोहन सिंग- १८,६५० शब्द (१९९१)अरुण जेटली- १८,६०४ शब्द (२०१७)अरुण जेटली- १८,१२२ शब्द (२०१५)अरुण जेटली- १७,९९१ शब्द (२०१८)अरुण जेटली- १७,५२८ शब्द (२०१४) 

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनArun Jaitleyअरूण जेटलीManmohan Singhमनमोहन सिंग