शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Budget 2019: शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 2:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहापंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्पात लोकसभेत सादर केला.

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जी अपेक्षा होती. ती या अंतरिम अर्थसंकल्पातून पूर्ण होणार आहे. देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. सरकारच्या तिजोरीवर 75 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे, तरीही शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतून शेकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय, बँकेचे कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतले नाही, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असेही अमित शहा म्हणाले. 

Budget 2019 Latest News & Live Updates

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं
टॅग्स :Amit Shahअमित शहाBudget 2019अर्थसंकल्प 2019piyush goyalपीयुष गोयलFarmerशेतकरीBudgetअर्थसंकल्प