Budget 2018 : अरुण जेटली मांडणार अर्थसंकल्प, असा असणार त्यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 09:06 AM2018-02-01T09:06:44+5:302018-02-01T10:50:21+5:30

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

Budget 2018 : FM arun jaitley modi sarkar budget day schedule | Budget 2018 : अरुण जेटली मांडणार अर्थसंकल्प, असा असणार त्यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम

Budget 2018 : अरुण जेटली मांडणार अर्थसंकल्प, असा असणार त्यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम

Next

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. सलग पाचव्यांदा ते अर्थसंकल्प मांडत आहेत.  केवळ देशाचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष अरुण जेटली यांच्यावर आहे. अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा ते करणार आहेत, यावर सर्वांची नजर आहे.  अर्थसंकल्प मांडण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा कार्यक्रम सकाळापासून ते संध्याकाळपर्यंत व्यस्त स्वरुपाचा असणार आहे. 

असा असणार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आजचा कार्यक्रम 
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज सकाळी 9 वाजता अर्थमंत्रालयात पोहोचलतील. येथे मंत्रालयातील अधिका-यांसोबत ते चर्चा करुन ते राष्ट्रपती भवनाकडे रवाना होतील. 

- राष्ट्रपती भवनात दाखल झाल्यानंतर ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. येथे ते अर्थसंकल्पाच्या प्रतवर राष्ट्रपती यांची स्वाक्षरी घेतील. यानंतर ते थेट संसदेच्या दिशेनं रवाना होतील. 

-  अरुण जेटली संसदेत पोहोचेपर्यंत अर्थसंकल्पाच्या प्रतदेखील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत संसदेत पोहोचवल्या जातील. सखोल चौकशी-तपासणीनंतर या प्रत संसदेत नेल्या जातील.

- अरुण जेटली सकाळी 10 वाजता संसदेत पोहोचतील.  

- संसदेत दाखल झाल्यानंतर अर्थमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होतील.

- यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात येईल.  

- मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात होईल. 

-  दीड ते दोन तास अर्थसंकल्प मांडला जाईल. मात्र अर्थसंकल्प मांडण्यास लागणार कालावधी पूर्णतः अरुण जेटली यांच्यावर अवलंबून आहे. 

- दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अर्थसंकल्प पूर्णतः मांडून होईल.

- अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन

- 4 वाजण्याच्या सुमारास अरुण जेटली पत्रकार परिषद घेतील. 

- पत्रकार परिषदेत अरुण जेटली अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपा व सरकारमधील अन्य नेते अर्थसंकल्पाबाबत आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील. 

- अशा प्रकारे अरुण जेटली यांचा आजचा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे.
 



 



 



 

Web Title: Budget 2018 : FM arun jaitley modi sarkar budget day schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.