शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

Republic Day 2018 : प्रजासत्ताक दिनी सीमेवर जवान पाकला करणार नाहीत मिठाई वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 1:45 PM

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते.

श्रीनगर-  प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते. परंतु यंदा ते मिठाई वाटप करणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बीएसएफने यंदा पाकिस्तानी रेंजर्सना मिठाई न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरघोडी सुरू आहेत. अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येतो. आतापर्यंत नियंत्रण रेषेवर गोळीबार होत होता. परंतु पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवरही शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच भारतीय जवानांनी यंदा पाकिस्तानला मिठाई न देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढणारा तणाव दूर करण्यासाठी 25 जानेवारी रोजी पाकिस्तानी रेंजर्स आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्यादरम्यान एक बैठक झाली होती.  पाकिस्तानच्या विनंतीनंतर या बैठकीत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. 

 पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असतं. पूंछ सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात 7 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते, तर चार सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं. याच्याविरोधात भारताने कारवाई केली होती.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला जातो. यात पाकचे सात जवान ठार झाले होते. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ‘जैश- ए- मोहम्मद’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८