पठाणकोटमध्ये बीएसएफने घुसखोरीचा कट उधऴला, एक घुसखोर ठार
By Admin | Updated: January 21, 2016 13:09 IST2016-01-21T12:42:08+5:302016-01-21T13:09:43+5:30
पठाणकोट येथील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न करणारा एक घुसखोर गुरुवारी सकाळी बीएसएफने केलेल्या गोळीबारात ठार झाला.

पठाणकोटमध्ये बीएसएफने घुसखोरीचा कट उधऴला, एक घुसखोर ठार
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. २१ - पठाणकोट येथील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न करणारा एक घुसखोर गुरुवारी सकाळी बीएसएफने केलेल्या गोळीबारात ठार झाला. दोन जानेवारीला येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षापथके प्रचंड सर्तक झाली आहेत.
एकूण तीन घुसखोर घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यातील एक जण ठार झाला दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर बामियाल भागात तैनात असलेल्या बीएसएफच्या पथकाला काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या.
जवानांनी त्या दिशेने गोऴीबार केला असता एक घुसखोर ठार झाला दोघे पळून गेले. गुरुदासपूर सेक्टरमध्ये ही घटना घडली.