थोडक्यात नागपूर जोड

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:11+5:302014-12-25T22:41:11+5:30

लोहिया अध्ययन केंद्रातर्फे सुरेश खलालेंचा सत्कार

Briefly connect Nagpur | थोडक्यात नागपूर जोड

थोडक्यात नागपूर जोड

हिया अध्ययन केंद्रातर्फे सुरेश खलालेंचा सत्कार
नागपूर : लोहिया अध्ययन केंद्रातर्फे आयुर्वेदाचार्य डॉ.सुरेश खलाले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी न्या. संजय बुरडकर होते. यावेळी लोहिया अध्ययन केंद्राचे महासचिव हरीश अड्याळकर यांनी डॉ. सुरेख खलाले यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. खलाले यांनी आरोग्य शिबिर, व्याख्यानाच्या माध्यमातून समाजाला सेवा दिल्याचे अड्याळकर यांनी सांगितले. डॉ. बाळकृष्ण महाजन यांनी डॉ. खलाले शासकीय सेवेतून निवृत्त झाले, परंतु त्यांची समाजसेवा सुरूच असल्याचे सांगितले. डॉ. राजेंद्र पटोरिया यांनी डॉ. खलाले शरीर आणि मन स्वस्थ ठेवत असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. खलाले यांनी आयुर्वेद विज्ञान असून चांगला आहार, योग्य झोप आणि ब्रह्मचर्य यामुळे आरोग्य लाभत असल्याचे सांगितले. संचालन टीकाराम साहू यांनी केले. आभार डॉ. बाळकृष्ण महाजन यांनी मानले.

हुडकेश्वर येथे सीआरई कार्यक्रमाचा समारोप
नागपूर : धोंडबाजी सोनटक्के विशेष शिक्षक पदविका प्रशिक्षण केंद्र हुडकेश्वर येथे सीआरई कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक राहुल सोनटक्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून मूक बधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश खांडेकर, शिल्पा क्षीरसागर, विशेष शिक्षक सुमीत कांबळे उपस्थित होते. यावेळी अविनाश पांडे, अतुल जाधव, राजीव गांधी, संदीप लांजेवार यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाला राहुल सोनटक्के, राजेश खांडेकर यांनी सीआरई प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. संचालन कोमल भोपे यांनी केले. आभार मंजुषा लांडगे यांनी मानले.

मोटार कामगार फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन
नागपूर : महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे २७ वे त्रैवार्षिक अधिवेशन भाऊसाहेब चांद्रायण नगरी आकरे मंगल कार्यालय वर्धा येथे संपन्न झाले. केंद्रिय श्रमिक शिक्षा बोर्डाचे अध्यक्ष लक्ष्माजी रेड्डी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी मारोतराव झोटिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार सुरेश वाघमारे, भारतीय परिवहन मजदूर महासंघाचे अध्यक्ष चेतन देसाई, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव के. पी. सिंग, फेडरेशनचे मुख्य सचिव आप्पाराव साताळकर उपस्थित होते. यावेळी अधिवेशनात एसटीच्या मुळावर येणाऱ्या मॅक्सी कॅबला प्रवासी वाहतुकीचा परवाना देऊ नये, एसटी भ्रष्टाचार मुक्त करा, एसटीतील अमान्यताप्राप्त संघटनांना मान्यता द्यावी, एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. संचालन अरविंद बाभळे यांनी केले. आभार आप्पाराव साताळकर यांनी मानले.

Web Title: Briefly connect Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.