काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जाऊ तिथे खाऊ’ नावाच्या चित्रपटामध्ये शेतातील विहिरच चोरीला गेल्याचा अजब प्रकार तुम्ही पाहिला असेल. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथे एक ६० फूट लांबीचा पूल चोरीला गेला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. एवढंच नाही तर कोरबाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडेही याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकारामुळे पोलीस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील कोरबा शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या हसदेव डाव्या कालव्यामध्ये अनेक वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. तो सुमारे ४० वर्षे जुना होता. हा पूल सुमारे ६० फूट लांब आणि ५ फूट रुंद होता. दरम्यान, काल रात्री ११ वाजेपर्यंत हा पूल उभा होता. तसेच लोकांचीही त्यावरून ये जा सुरू होती. मात्र लोकांनी सकाळी उठून पाहिलं असता, हा पूल गायब असल्याचे निदर्शनास आले. पूल चोरीस गेल्याची माहिती स्थानिक नगरसेवक लक्ष्मण श्रीवास यांना देण्यात आली.
त्यानंतर लक्ष्मण श्रीवास यांनी त्वरित एक अर्ज लिहून पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांच्याकडे तक्रार दिली. तसेच पूल चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी कुणाल दुदाववर यांच्याकडेही केली आणि कारवाईची मागणी केली. या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली. तसेच पोलिसांच्या एका विशेष तपास पथकाची नियुक्ती करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, जो पूल चोरीस गेला, तो लोखंडापासून तयार केलेला होता. तसेच मोठमोठे गर्डर टाकून रेल्वेच्या रुळांसारखी रचना करून हा पूल उभारण्यात आला होता.
Web Summary : In Chhattisgarh's Korba, a 60-foot bridge disappeared overnight, prompting a police investigation. Local officials reported the theft after residents discovered the bridge missing, causing alarm among authorities. The iron bridge's disappearance is under scrutiny.
Web Summary : छत्तीसगढ़ के कोरबा में एक 60 फुट का पुल रातोंरात गायब हो गया, जिसके बाद पुलिस जांच शुरू हो गई है। स्थानीय अधिकारियों ने निवासियों द्वारा पुल गायब पाए जाने के बाद चोरी की सूचना दी, जिससे अधिकारियों में चिंता फैल गई। लोहे के पुल के गायब होने की जांच चल रही है।