सात जन्मांचं वचन सात मिनिटंही टिकलं नाही; सासरी जाताना कार थांबवून नवरी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:32 AM2021-08-10T11:32:09+5:302021-08-10T11:34:02+5:30

नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का; अद्याप पोलीस तक्रार नाही

bride ran away with her lover after marriage in temple at deoria | सात जन्मांचं वचन सात मिनिटंही टिकलं नाही; सासरी जाताना कार थांबवून नवरी फरार

सात जन्मांचं वचन सात मिनिटंही टिकलं नाही; सासरी जाताना कार थांबवून नवरी फरार

googlenewsNext

देवरिया: उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भटनी परिसरातील मंदिरात विवाह सोहळा संपन्न झाल्यावर सासरी निघालेली नवविवाहित तरूणी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सासरी जात असताना कार रस्त्यात थांबवून तरूणी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. या घटनेची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

खुखुंदू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह भटनी परिसरात वास्तव्यास असलेल्या तरुणीशी ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं सोमवारी एका मंदिरात लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. वधूकडच्यांनी वरपक्षाचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर सायंकाळी लग्न सोहळा विधिवत संपन्न झाला. मुलीकडच्यांनी नवविवाहितेची पाठवणी केली. नवरी कारमध्ये बसून सासरी निघाली. कारनं थोडं अंतर कापताच तिनं थांबायला सांगितलं. काही काम असल्याचं सांगून ती कारमधून उतरली आणि बराच वेळ परतली नाही.

बराच वेळ होऊनही नवरी न परतल्यानं नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबीयांना चिंता वाटू लागली. नवऱ्यानं आणि त्याच्या घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र नवरीचा शोध लागला नाही. नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती नंतर त्यांना समजली. त्यामुळे मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. या प्रकरणी अद्याप तरी मुलाकडील मंडळींनी पोलीस तक्रार दाखल केलेली नाही.

Web Title: bride ran away with her lover after marriage in temple at deoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.