Breaking News :Union Minister Shripad Naik's car crashed, his wife died and Naik was seriously injured | Breaking News :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू, नाईक गंभीर जखमी

Breaking News :केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू, नाईक गंभीर जखमी

पणजी - केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला भीषण अपघात झाला असून, या अपघातात श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी असलेल्या श्रीपाद नाईक यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. हा अपघात कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यामध्ये झाला.  

कर्नाटकमधील येल्लापूर येथे नाईक यांच्या कारला हा भीषण अपघात झाला. हा अपघातात इतका भीषण होता की त्यात नाईक यांच्या कारचा चेंदामेंदा झाला. तसेच या अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या श्रीपाद नाईक यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अपघाताचे वृत्त समजतात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी तातडीने संवाद साधला आहे. तसेच नाईक यांच्यावर तातडीने उपचारांची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. श्रीपाद नाईक हे भाजपाचे गोव्यातील ज्येष्ठ नेते असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सध्या मोदी सरकारमध्ये ते आयुष मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी या अपघातात निधन झालेल्या श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Breaking News :Union Minister Shripad Naik's car crashed, his wife died and Naik was seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.