शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चिनी वस्तूंवर बहिष्काराचे शस्त्र; सर्वत्र जनजागृती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:58 IST

आर्थिक नाकेबंदीची मागणी; सीमेवर आगळीक करणाऱ्या देशाला अद्दल घडविण्याचे आवाहन

- प्रसाद गो. जोशी नाशिक : सीमेवर आगळीक करून भारतीय जवानांच्या जीवितास हानी पोहोचविणाºया चीनच्या विरोधात देशभर जनमत प्रचंड तापले असून, चीनमधून येणाºया वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला अद्दल घडविण्याचा निर्धार जनमानसातून व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी यासाठी आंदोलने सुरू झाली असून, त्यास जनतेचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे.भारतीयांच्या रोजच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी या चीनमधून आयात झालेल्या असतात. टूथपेस्टपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. ही उत्पादने भारतातही तयार होतात. मात्र त्यांचे मूल्य जास्त असल्यामुळे अनेकजण चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देत असतात. भारतीयांनी चिनी वस्तू वापरणे बंद केले तर चीनला मिळणारे उत्पन्न बंद होऊ शकते, असे मत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.चीनमधून भारत विविध प्रकारच्या वस्तू अनेक वर्षांपासून आयात करीत आहे. भारत हा चीनचा मोठा आयातदार देश आहे. मात्र भारताकडून मिळणारा पैसा भारताच्या विरोधातच वापरणाºया चीनबद्दल सर्वत्र संताप आहे. त्यामुळेच चिनी मालावर बहिष्कार घालून भारताने स्वावलंबी बनावे, अशी भावना अनेक मान्यवर व्यक्ती व समूह करीत आहेत. भारताने स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशीचा पुरस्कार केला आहे.1905मध्ये लोकमान्य टिळकांनी देशवासीयांना दिलेल्या चतु:सूत्रीत स्वदेशीचा पुरस्कार केला होता. पुढे स्वातंत्र्य आंदोलनात परकीय वस्तूंची होळी केली गेली. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वदेशीच्या जोडीलाच स्वावलंबनाचाही अंगीकार करण्याचे आवाहन केले. भारताने चिनी वस्तूंवरील आपले अवलंबित्व कमी केल्यास भारतात रोजगार वाढू शकतो, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या ओप्पो, शाओमी, विवो, टेक्नो, रिअलमी, इन्फिनिक्स, वन प्लस आदी कंपन्यांचे मोबाइल मोठ्या प्रमाणात येतात. पण त्यापैकी बहुसंख्य मोबाइल लवकर बिघडतात वा खराब होतात, अशी लोकांची तक्रार असल्याचे दिसून आले.चीनमधून दुग्धजन्य पदार्थ, फळे, सुकामेवा, चहा, कॉफी, मसाले, खाद्य तेल, तेलबिया, धान्य, औषधे, रसायने, साखर, कॅमेरे, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, विविध यंत्रसामुग्री,संगणकाचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक तसेच इलेक्ट्रिकच्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, फॅट्स, मासे, पादत्राणे आदींची आयात होते. पण भारतीय कंपन्याही या सर्व वस्तू तयार करतात. त्या वापरल्यास भारतात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.टिकटॉक, हॅलो, शेअरइट, क्वाई, यूसी ब्राउजर, बिगो लाईव्ह, झेंडर, कॅम स्कॅनर ही अ‍ॅप सर्रास वापरली जातात. अनेकांना ही अ‍ॅप वा मोबाइल गेम चिनी आहेत, हेच माहीत नसते.2018-19 या वर्षामध्ये भारताने चीनकडून आयात केलेल्या वस्तूंचे मूल्य ४,९२,०७,९२८.३४ लाख रुपये एवढे असून, देशाच्या आयातीतील हे प्रमाण १३.६८ टक्के इतके वाढले आहे.2019-20 या वर्षामध्ये भारताने चीनकडून केलेल्या आयातीचे मूल्य ४,४०,१०,१६८.४७ लाख इतके म्हणजे काहीसे कमी झाले असले तरी देशाच्या एकूण आयातीपैकी ही वाढ अधिकच म्हणजे १४.०८ टक्के एवढी होती.भारतामधील विविध स्टार्टअपमध्ये चिनी उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. त्या माध्यमामधूनही चीन आपल्याकडे पैसा ओढत आहे. सरकारने या बाबीकडे लक्ष देऊन चीनच्या गुंतवणुकीला पायबंद घालण्याची गरज आहे.- प्रवीण खंडेलवाल, सरचिटणीस, सीएआयटी

टॅग्स :chinaचीन