दोन्ही दुचाकीस्वार मद्यधुंद, बसच्या धडकेपूर्वीच एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:44 IST2025-10-27T09:43:50+5:302025-10-27T09:44:12+5:30
बॅटरीमध्ये झालेल्या स्फोटामुळे बसमध्ये लागली हाेती आग

दोन्ही दुचाकीस्वार मद्यधुंद, बसच्या धडकेपूर्वीच एक ठार
कुर्नूल : आंध्र प्रदेशात बसमधील १९ प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकीवरील दोघेही मद्यधुंद होते. त्यातील एकाचा बस धडकण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, अशी माहिती पुढे आली आहे. बसच्या दरवाजाच्या मागे असलेल्या दोन १२ केव्ही बॅटरीमध्ये झालेल्या स्फोटामुळे बसमध्ये मोठी आग लागली होती.
२४ ऑक्टोबर रोजी कुर्नूल जिल्ह्यात एक दुचाकी खाजगी बसखाली आली होती. बस धडकण्यापूर्वीच दुचाकीचा आणखी एक अपघात झाला होता. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. धडक झाल्यानंतर दुचाकी बसखाली काही अंतरापर्यंत ओढली गेली. त्यामुळे त्याची इंधन टाकी फुटली आणि बसने पेट घेतला. कुर्नूल रेंजचे डीआयजी कोया प्रवीण यांनी सांगितले की, दुचाकीस्वार शिव शंकर आणि एरी स्वामी मद्यधुंद होते, याची फॉरेन्सिक चाचण्यांमधून पुष्टी झाली आहे.
शिव शंकर तुग्गली गावात स्वामीला सोडण्यासाठी निघाला होता. ते २:२४ वाजता पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. पेट्रोल पंप सोडल्यानंतर काही वेळातच दुचाकी घसरली. यामुळे शंकर दुभाजकाला धडकला आणि जागीच मरण पावला.