सीमारेषेवर जवानांनी उधळला घुसखोरीचा कट, एका दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 08:47 IST2017-09-26T08:46:41+5:302017-09-26T08:47:33+5:30

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टर परिसरात भारतीय लष्करानं नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळून लावला आहे.

Border intrusion by the soldiers on the border, the end of a terrorist | सीमारेषेवर जवानांनी उधळला घुसखोरीचा कट, एका दहशतवाद्याचा खात्मा

सीमारेषेवर जवानांनी उधळला घुसखोरीचा कट, एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर - उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टर परिसरात भारतीय लष्करानं नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा कट उधळून लावला आहे. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतावाद्याला यमसदनी धाडण्यातही जवानांना यश मिळाले आहे. 

लष्कराच्या एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरच्या झोरावर क्षेत्रात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला व एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान, चकमक घडलेल्या स्थळावरुन एक हत्यारदेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या अधिका-यानं दिली आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. 


Web Title: Border intrusion by the soldiers on the border, the end of a terrorist