शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत पुस्तकांवरून जुंपली! निशिकांत दुबेंनी केला नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख; स्पीकर चेंबरमध्येही राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:04 IST

माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पुस्तकांवरून राजकीय महायुद्ध पेटले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्या संबंधांवरील पुस्तकाचा उल्लेख करत गांधी परिवारावर सडकून टीका केली, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.

नेमकं प्रकरण काय? 

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देऊन चीनच्या घुसखोरीबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींना हे पुस्तक कोट करण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याला उत्तर देण्यासाठी बुधवारी भाजप खासदार निशिकांत दुबे मैदानात उतरले. दुबे यांनी केवळ प्रत्युत्तर दिले नाही, तर चक्क नेहरू-गांधी घराण्यावर लिहिलेली ३-४ वादग्रस्त पुस्तकेच सभागृहात आणली.

दुबेंचे गंभीर आरोप आणि विरोधकांचा संताप 

निशिकांत दुबे यांनी भाषणादरम्यान अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. "आजकाल अशा पुस्तकाचा गाजावाजा केला जात आहे जे अद्याप प्रकाशितही झालेले नाही. पण मी आज त्या पुस्तकांबद्दल सांगणार आहे, जी नेहरू घराण्याची गद्दारी, भ्रष्टाचार आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींनी भरलेली आहेत," असे दुबे म्हणाले. त्यांनी 'एडविना अँड नेहरू' या पुस्तकासह इतर काही पुस्तकांतील आक्षेपार्ह संदर्भ देण्यास सुरुवात केली.

दुबेंच्या या विधानांमुळे काँग्रेस खासदारांच्या संतापाचा कडेलोट झाला. विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. स्पीकर ओम बिर्ला यांनी दुबेंना वारंवार टोकले, मात्र तरीही त्यांनी आपले बोलणे सुरूच ठेवले. गोंधळ इतका वाढला की अध्यक्षांना सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.

स्पीकरच्या चेंबरमध्येही खडाजंगी 

सभागृह तहकूब झाल्यानंतर हे नाट्य संपले नाही. स्पीकर ओम बिर्ला यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना चर्चेसाठी आपल्या चेंबरमध्ये बोलावले होते. तिथेही विरोधकांनी आपला रोख कायम ठेवला. "जर राहुल गांधींना एका पुस्तकावर बोलू दिले जात नाही, तर भाजप खासदाराला अशा वादग्रस्त पुस्तकांचा उल्लेख करण्याची परवानगी कशी दिली गेली?" असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. काँग्रेस खासदारांनी निशिकांत दुबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत अध्यक्षांकडे आपली नाराजी व्यक्त केली.

संसदेत तणावाचे वातावरण 

या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरात अनेकदा विस्कळीत झाले. सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर दुपारी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी भारत-अमेरिका व्यापारावर निवेदन दिले, मात्र गोंधळामुळे काहीही ऐकू येत नव्हते. दरम्यान, मंगळवारीच गैरवर्तणुकीमुळे काँग्रेसच्या ७ आणि माकपच्या १ खासदाराला निलंबित करण्यात आले आहे, त्यामुळे विरोधक आधीच आक्रमक भूमिकेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Parliament uproar: Book references spark clash, speaker's chamber sees heated debate.

Web Summary : Parliament witnessed chaos as book references ignited a political firestorm. Nishikant Dubey's Nehru-Edwina book mention triggered Congress protests, leading to adjournments and heated exchanges in the speaker's chamber. Opposition seeks action against Dubey.
टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसdelhiदिल्ली