२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 08:09 IST2024-11-01T06:09:54+5:302024-11-01T08:09:35+5:30
धमकी आलेल्या विमानांमध्ये एअर इंडिया कंपनीच्या ३६, विस्ताराच्या ३५ आणि इंडिगो कंपनीच्या ३२ विमानांना धमकी आली होती. दरम्यान, गेल्या १६ दिवसांत ५१० विमानांना धमकी आली होती.

२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम
मुंबई : विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्याच्या प्रकारांत सातत्याने वाढ होत असून गेल्या २४ तासांत देशातील विविध विमान कंपन्यांना आलेल्या धमक्यांची संख्या १०० पेक्षा जास्त अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धमक्यांमुळे या विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यानंतर निर्धारित नियमांनुसार त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीदरम्यान या विमानांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही; परंतु यामुळे या विमानांना किमान तीन ते चार तास विलंब झाला आणि याचा फटका प्रवाशांना
बसला.
धमकी आलेल्या विमानांमध्ये एअर इंडिया कंपनीच्या ३६, विस्ताराच्या ३५ आणि इंडिगो कंपनीच्या ३२ विमानांना धमकी आली होती. दरम्यान, गेल्या १६ दिवसांत ५१० विमानांना धमकी आली होती.