मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:39 IST2025-12-04T14:21:31+5:302025-12-04T14:39:07+5:30
मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बच्या धमकीनंतर अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १८० प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
मदिनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानात बॉम्बेची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात १८० प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.
मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली, त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. एटीसीने सावधगिरी बाळगत विमान अहमदाबादकडे वळवण्याचे निर्देश दिले. विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरले.
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
विमानाच्या सुरक्षित आणि आपत्कालीन लँडिंगनंतर, विमानतळ सुरक्षा संस्था, बॉम्ब पथके आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी विमानाची तपासणी केली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, विमानाच्या आत शोध मोहीम सुरू आहे.
बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली, पण आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. विमानात १८० प्रवासी होते. बॉम्ब धमकीची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले. त्याने ही धमकी का दिली आणि तो मानसिकदृष्ट्या निरोगी होता की त्याचा काही वेगळा हेतू होता हे जाणून घेण्यासाठी अहमदाबाद पोलिस त्याची चौकशी करत आहेत.