शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

काँग्रेस- तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मतदान केंद्राजवळ फेकला गावठी बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 4:24 PM

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या

कोलकाता: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्येकाँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. यावेळी मतदान करण्यासाठी रांगेत उभा असलेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना मुर्शिदाबादमधील बलिग्राममध्ये घडली. 

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान मुर्शिदाबादमध्ये टीएमसी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. येथील राणीनगरमधील मतदान केंद्र क्रमांक 27 आणि 28 जवळ काही अज्ञात लोकांनी गावठी बॉम्ब फेकला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या बॉम्ब स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र बंद केले आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये बॉम्ब फेकतानाचे दृष्य स्पष्ट दिसत आहे. 

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्येच नाही तर अन्य ठिकाणीही हिंसक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मालदामधील मतदान केंद्र क्रमांक 216 वर मतदारांना मतदान करण्यास रोखल्यामुळे मारहाण झाल्याचे समजते. 

दरम्यान, मतदानाच्या तिस-या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होणार असून, त्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचाही समावेश आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. 

यांच्या भवितव्यावर आज मतदारांचा निर्णय...राहुल गांधी । वायनाडअमेठी या आपल्या नेहमीच्या मतदारसंघाबरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातून कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे निवडणूक लढवित आहेत.जमेची बाजू : सलग दोनदा येथून कॉँग्रेसने विजय मिळविला आहे. भाजपचे येथे अस्तित्व नसल्याने भाजपने हिंदुत्ववादी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.आव्हान कोणाचे : डाव्या आघाडीचे पी. पी. सुनीर यांनी आव्हान दिले आहे. बसप, सोशल डेमॉक्रेटिक पार्टी आॅफ इंडिया, भाजपचा पाठिंबा असलेली भारत धर्म जन सेना, तसेच अन्य पक्षांचे व १४ अपक्ष उमेदवारही आहेत.

अमित शहा । गांधीनगरगुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याऐवजी निवडणूक लढवित आहेत.जमेची बाजू : हा मतदारसंघ १९९६ पासून सातत्याने भाजपाच्या ताब्यात आहे. शहा हे यापूर्वी विधानसभेमध्ये सरखेज येथून निवडून आले होते. हा मतदारसंघ गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे शहा यांचा संपर्क, भाजपच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी आहे.आव्हान कोणाचे : कॉँग्रेसचे आमदार सी. जे. चावडा मैदानात आहेत.

मुलायमसिंह यादव । मैनपुरीउत्तर प्रदेशचा मैनपुरी मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा गड आहे. यावेळी ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव हे उमेदवार आहेत. जमेची बाजू : चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या विरोधात कॉँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही.आव्हान कोणाचे : भाजपने येथून प्रेम सिंह शाक्य यांना निवडणूक मैदानामध्ये उतरविले आहे.

टॅग्स :murshidabad-pcमुर्शिदाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस