दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:47 IST2025-10-24T11:41:45+5:302025-10-24T11:47:31+5:30
दिल्ली पोलिसांनी दोन ISIS च्या दहशतवाद्यांना अटक केली. दिल्लीच्या बाजारपेठेत बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळून लावला आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

दिल्लीत बॉम्बस्फोटाचा कट उधळला; दोन ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक
दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. ISIS च्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. दोन संशयित दहशतवाद्यांपैकी एक दिल्लीचा रहिवासी आहे, तर दुसरा मध्य प्रदेशचा आहे.
या दहशतवाद्यांकडून संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. या मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवाद्याला भोपाळमधून अटक केली, तर दुसऱ्या संशयिताला दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील अधिक गर्दीचे क्षेत्र या दहशतवाद्यांचे लक्ष्य होते.
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यांचे प्रशिक्षण घेतले होते. ते हल्ला करणारच होते. दोन्ही दहशतवाद्यांकडून दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव अदनान आहे.
हे दहशतवादी दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी हल्ला करणार होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडून सर्व माहिती गोळा केली जात आहे.
मोठी दुर्घटना टळली
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे आरोपी आयसिसशी संबंधित आहेत. हे दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.