शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

बॉलिवूडच्या कलाकारांनीही लावली आहे लोकसभेमध्ये हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:00 AM

दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणावर तेथील चित्रपटसृष्टीचा प्रचंड प्रभाव आहे, अनेक कलाकार तेथील राजकारणात सक्रिय आहेत, असे सततत सांगण्यात येत असते.

नवी दिल्ली : दक्षिणेकडील राज्यांच्या राजकारणावर तेथील चित्रपटसृष्टीचा प्रचंड प्रभाव आहे, अनेक कलाकार तेथील राजकारणात सक्रिय आहेत, असे सततत सांगण्यात येत असते. पण हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारही राजकारणात आले आणि ते लोकसभेवर निवडूनही आले, असे दिसून येते. मात्र पहिला अभिनेता लोकसभेवर गेला, तो मात्र होता दक्षिणेकडील राज्यातलाच.आंध्र प्रदेशातील ओंगोल मतदारसंघातून १९६७ साली काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले ते तेलगू अभिनेते होते कोंगरा जग्गय्या. त्यानंतरच्या अनेक निवडणुकांद्वारे चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार लोकसभेवर निवडून गेले.अभिनेते सुनील दत्त वायव्य मुंबईतून १९८४ साली लोकसभेवर निवडून गेले. त्या मतदारसंघाचे त्यांनी पाच वेळा प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या पत्नी नर्गिस दत्त याही खासदार होत्या. पण त्या राज्यसभा सदस्य होत्या. वैजयंती माला याही १९८४ साली मद्रास (आता चेन्नई) दक्षिण मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. त्याचवर्षी अमिताभ बच्चन हेही अलाहाबादमधून काँग्रेसतर्फे विजयी झाले. त्यांनी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता. त्यांच्या पत्नीही खासदार आहेत. पण राज्यसभा सदस्य असलेल्या जया बच्चन या समाजवादी पक्षात आहेत.दूरदर्शनवरील रामायण मालिकेतील सीता म्हणजे दीपिका चिखलिया व रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी १९९१ साली अनुक्रमे बडोदा व साबरकांठामधून भाजपातर्फे निवडून आले होते. तेव्हा राम मंदिर हा मुद्दा भाजपाने जोरात लावून धरला होता. महाभारत या मालिकेतील कृष्ण म्हणजे नितीश भारद्वाज हेही १९९६ साली जमशेदपूरमधून निवडून आले होते.राजेश खन्ना यांनी १९९२ ते १९९६ या काळात नवी दिल्ली मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी तेव्हा भाजपाच्या शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला होता. मात्र १९९१ साली राजेश खन्ना यांचा भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १५८९ मतांनी पराभव केला होता. विनोद खन्ना भाजपातर्फे पंजाबच्या गुरूदासपूरमधून तीनदा निवडून आले होते आणि ते केंद्रात मंत्रीही होते. शत्रुघ्न सिन्हा भाजपातर्फे बिहारच्या पाटणासाहिबमधून १९९९ व२0१४ साली निवडून आले. तेही केंद्रातमंत्री होते. पण बंडखोरी करणाऱ्या सिन्हायांना यंदा भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षातर्फे उभे राहणार, हे स्पष्ट नाही.राज बब्बर हे दोनदा समाजवादी पार्टीतर्फे तर एकदा काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशातून निवडून आले. ते यंदाही काँग्रेसचे उमेदवार आहेत. अभिनेत्री जया प्रदा दोनदा समाजवादी पक्षातर्फे लोकसभेवर निवडून गेल्या. पण २0१४ साली त्या पराभूत झाल्या. यंदा त्या रिंगणात नाहीत. गोविंदा २00४ साली काँग्रेसतर्फे उत्तर मुंबईतून भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून निवडून आले होते. धर्मेंद्र हे २00४ साली राजस्थानमधून भाजपातर्फे लोकसभेत गेले होते. त्यांच्या पत्नी हेमा मालिनी याही भाजपातर्फे २0१४ साली मथुरातून निवडून आल्या. त्या यंदाही निवडणूक लढवत आहेत.याखेरीज परेश रावल (गुजरात), किरण खेर (चंदीगड), मनोज तिवारी (दिल्ली) व गायक बाबुल सुप्रियो हेही २0१४ साली भाजपातर्फे लोकसभेवर निवडून गेले. अभिनेत्री मूनमून सेन या बंगालमधून तृणमूल काँग्रेसतर्फे निवडून गेल्या. यंदाही त्या रिंगणात आहे. याखेरीज अन्य पक्षांतर्फे यंदाही काही कलाकार निवडणूक लढवत आहेत.पराभूत सेलिब्रिटीलोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, दिग्दर्शक मुझफ्फर अली, नफिसा अली, शेखर सुमन, गुल पनाग, जॉय बॅनर्जी, जावेद जाफ्री, महेश मांजरेकर, राखी सावंत यांचा समावेश आहे. पराभूत होऊ नही भाजपाने स्मृती इराणी यांना मंत्री केले. त्या यंदाही अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Hema Maliniहेमा मालिनीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक