शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बोफोर्स घोटाळा: 12 वर्षं जुन्या प्रकरणावरच्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 9:38 PM

बोफोर्स तोफांच्या खरेदीमधील कथित घोटाळा झालेल्या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली: बोफोर्स तोफांच्या खरेदीमधील कथित घोटाळा झालेल्या प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी 31 मे 2005 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या घोटाळ्यातील युरोपियन आरोपी हिंदुजा बंधूंविरुद्धचे सर्व आरोप रद्द केले आहेत. त्याविरोधात सीबीआयने आरोपींविरुद्धचे सर्व पुरावे रद्द करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाला आव्हान दिल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. बोफोर्स तोफांच्या खरेदीदरम्यान 64 कोटी रुपयांचा कथित घोटाळा झाला होता. या प्रकरणात आरोपी असलेले युरोपात राहणारे उद्योगपती हिंदुजा बंधू आणि बोफोर्स कंपनीविरुद्ध असलेले सर्व आरोप फेटाळले होते.अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनीसुद्धा सीबीआयला दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 12 वर्षांनंतर याचिकेद्वारे आव्हान न देण्याचा सल्ला दिला होता. परंतु तो धुडकावत सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तर गेल्या दिवसांपूर्वी सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासंदर्भात केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाला पत्र लिहिले होते. सीबीआयला त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायची असल्यानं अखेर त्यांनी तशी याचिका दाखल केली आहे. सीबीआयने 2005मध्येही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली होती, पण तत्कालीन यूपीए शासनाने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा बंद झाली होती. परंतु ह्यसीबीआयह्णने या प्रकरणाना पुन्हा एकदा नव्यानं फोडणी दिली आहे. त्यामुळे आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटून आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग