Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 08:20 IST2025-09-08T08:18:38+5:302025-09-08T08:20:05+5:30
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे रविवारी (७ सप्टेंबर २०२५) धक्कादायक घटना घडली.

Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चक्रधरपूर येथे रविवारी (७ सप्टेंबर २०२५) धक्कादायक घटना घडली आहे. भारत भवन चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
महिलेची हत्या करण्यात आली असल्याचा संशय आहे आणि नंतर मृतदेह पोत्यात भरून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आला, असा पोलिसांना संशय आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्या महिलेची ओळख आणि मृत्यूच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत. मृत महिला ३० वर्षांपेक्षा जास्त वयाची असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, अशी माहिती चक्रधरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अवधेश कुमार यांनी दिली.