अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:00 IST2025-09-17T13:00:23+5:302025-09-17T13:00:51+5:30

Navjot Singh : बीएमडब्ल्यू कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजोत सिंग यांना अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी संदीप कौर स्ट्रेचरवर होत्या.

bmw case injured wife on stretcher husband body beside her this picture made every one cry | अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो

अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो

दिल्लीतील बीएमडब्ल्यू कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजोत सिंग यांना अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी संदीप कौर स्ट्रेचरवर होत्या. अपघाताने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पतीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. या दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

दोन दिवसांपूर्वी दक्षिण दिल्लीत एका वेगवान बीएमडब्ल्यूने  नवजोत यांच्या बाईकला जोरदार धडक दिली, ज्यामुळे नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. यामध्ये संदीप कौर गंभीर जखमी झाल्या. पतीचा मृत्यू झाल्याचं समजताच संदीप कौर यांना मोठा धक्का बसला. पतीला निरोप देण्यासाठी त्यांना स्ट्रेचरवरुन आणण्यात आलं. तेव्हा त्यांनी रडत रडत आपल्या पतीला स्पर्श केला. त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. 

बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट

"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

भीषण अपघातात भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. तर पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नवजोत यांचा २१ वर्षीय मुलगा नवनूर सिंगचा काल वाढदिवस होता. आपल्या पालकांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी तो खूप उत्सुक होता. त्याला त्याच्या पहिल्या पगारातून पालकांसाठी गिफ्टही घ्यायचं होतं. त्याला त्याच्या वडिलांसाठी घड्याळ आणि आईसाठी कानातले खरेदी करायचे होते. पण त्याआधीच आई-वडिलांचा अपघात झाला.

हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?

"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो

नवनूर सिंगने TOI ला दिलेल्या माहितीनुसार, "आई-वडील हे खूप चांगले मित्र होते. ते दर आठवड्याच्या शेवटी छोट्या डेटवर जायचे. माझे वडील ऑफिसला गाडीने जायचे, पण जेव्हा माझ्या आईला बाहेर घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा ते बाईकनेच जायचे. आम्ही १ सप्टेंबर रोजी आई-बाबांच्या लग्नाचा २३ वा वाढदिवस साजरा केला. आता माझ्या वाढदिवशी मी त्यांना पहिल्या पगारातून घेतलेलं गिफ्ट देऊ शकणार नाही."
 

Web Title: bmw case injured wife on stretcher husband body beside her this picture made every one cry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.