उत्तर प्रदेशात काँग्रेसला बसणार धक्का?; इमरान मसूद निवडणूकीपूर्वीच पक्ष सोडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 08:26 IST2022-01-11T08:25:57+5:302022-01-11T08:26:03+5:30
इमरान मसूद हे फार पूर्वीपासूनच सपमध्ये जाण्याच्या तयारीत होते.

उत्तर प्रदेशात काँग्रेसला बसणार धक्का?; इमरान मसूद निवडणूकीपूर्वीच पक्ष सोडण्याची शक्यता
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पश्चिम उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदायात वर्चस्व असणारे काँग्रेसचे नेते इमरान मसूद हे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून समाजवादी पक्षात दाखल होण्याची तयारी करीत आहेत. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जाईल. सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, पीलीभीत, खेरी, शाहजहांपूर आणि बदायूं या मुस्लिम बहुल भागात काँग्रेसला या सर्व मतदारसंघांत जिंकण्याची खात्री होती. मात्र, मसूद यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाने या भागात आणि उत्तराखंडमध्ये सहारनपूरशी लगत मतदारसंघात काँग्रेसचे नुकसान होऊ शकते. इमरान मसूद हे फार पूर्वीपासूनच सपमध्ये जाण्याच्या तयारीत होते.