पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:21 IST2025-10-20T16:18:15+5:302025-10-20T16:21:27+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील सैथली गावामध्ये पाटाच्या पाण्यावरून झालेल्या वादामधून रक्ताचे पाट वाहिले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाटाच्या पाण्यावरून झालेला वाद सोडवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वादावादी होऊन त्याचं पर्यावसान गोळीबारात झाले.

पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील सैथली गावामध्ये पाटाच्या पाण्यावरून झालेल्या वादामधून रक्ताचे पाट वाहिले गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाटाच्या पाण्यावरून झालेला वाद सोडवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये वादावादी होऊन त्याचं पर्यावसान गोळीबारात झाले. या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं दीपांशू भाटी (२१) आणि अजयपाल भाटी (५५) अशी आहेत. या प्रकरणी अनूप भाटी याने तक्रार दिली आहे. प्रिन्स भाटी, बोबी तोंगड आणि मनोज नागर यांनी आमच्यावर गोळीबार केला, त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
अनूप भाटी याने पोलिसांना सांगितले की, पाटाचं पाणी काढण्यावरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांची पंचायत बोलावण्यात आली होती. पंचायत सुरू असतानाच वाद वाढत गेला. त्याचदरम्यान प्रिन्स भाटी, बोबी तोंगड आणि मनोज नागर यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दीपांशू भाटी आणि अजयपाल भाटी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया देत रास्ता रोको केलं. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत. तसेच काही लोकांना ताब्यात घेऊन पुढील तपास केला जात आहे.