शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

गुरु-शिष्य परंपरेला काळिमा, शिक्षिकेने  लैंगिक शोषण करून अल्पवयीन विद्यार्थ्याला केले ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 13:54 IST

जीवनात गुरुचे स्थान हे माता-पित्याप्रमाणे असते. मात्रा आग्र्यामध्ये गुरु-शिष्याच्या या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना घडली आहे. येथील 15 वर्षांच्या एका विद्यार्थाने आपल्या शिक्षिकेवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

आग्रा, दि. 23 -  जीवनात गुरुचे स्थान हे माता-पित्याप्रमाणे असते. मात्रा आग्र्यामध्ये गुरु-शिष्याच्या या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना घडली आहे. येथील 15 वर्षांच्या एका विद्यार्थाने आपल्या शिक्षिकेवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ही शिक्षिका आणि तिची बहीण गेल्या 9 महिन्यांपासून आपले लैंगिक शोषण करत होती, असे या विद्यार्थ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  पीडित विद्यार्थ्याने याबाबत पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "या दोन्ही बहिणींनी आपले लैंगिक शोषण केले. तसेच आपला अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले. तसेच या कामात त्या दोघींच्या भावानेही त्यांना मदत केली. त्यानंतर हा अश्लिल व्हिडिओ ऑनलाइन साइट्सवर अपलोड करण्याची धमकी देत त्यांनी आपल्याकडे पैशांसाठीही तगादा लावला." लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलची शिकार झालेल्या या मुलाने त्या दोघींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या घरातून दागदागिने, पैसे आणि अन्य वस्तूंची चोरी केली. अधिक माहिती देताना हा मुलगा म्हणाला की, "वर्षभरापूर्वी मी 20-25 वर्षांच्या या महिलेकडे क्लासला जाण्यास सुरुवात केली. काही दिवसांनंतर ही शिक्षिक आणि तिची बहीण मला सोबत फिरायला घेऊन गेले. तेथे त्यांनी माझी अश्लिल छायाचित्रे घेतली. त्यानंतर मला अश्लिल चित्रफित दाखवत. अश्लिल चाळे करण्यास भाग पाडले. यावेळी या दोघींचा भाऊ छायाचित्रे घेत होता. पुढे त्यांनी मला माझ्या आईचे दागिने चोरण्यास सांगितले.  दरम्यान, या अल्पवयीन मुलाने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर या महिला आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला फरार झाल्या असून, भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .    आपल्या विवाहित मुलीचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करणा-या बापाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी चेन्नईत समोर आली होती. ही हत्या दुस-या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केली.  आरोपी मनालीमधील आपल्या घरी असताना, मुलीचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी संतापलेल्या पत्नीने मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला, ज्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला.   मृत आरोपीचं नाव दुरईराज असं होतं. चोरी, दरोड्यासारख्या गुन्ह्यांखाली त्याला अटकही करण्यात आली होती. त्याची पत्नी मंजुळाने जामीनावर सुटका केली होती. दुरईराज आणि मंजुळा आपल्या 21 वर्षीय मुलगी रजनीसोबत मनालीमध्ये राहत होते.  घरखर्च लावण्यासाठी मंजुळा घराजवळ चहाचं दुकान चालवयची. दुरईराज मात्र बेरोजगार होता. इतकंच नाही तर आपल्या पत्नीच्या दुकानातून पैसेही चोरी करायचा. यावरुन दोघांचं खूप मोठं भांडणही व्हायचं. दोन वर्षापुर्वी मंजुळा यांनी मुलीच्या लग्नासाठी मुलाच्या घरच्यांना बोलावलं होतं. यावरुन चिडलेल्या दुरईराजने मंजुळावर हल्ला करत, मान आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. त्यावेळी मंजुळा यांनी कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र यानंतर दुरईराजने मंजुळाला पैशांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली होती.   

टॅग्स :Crimeगुन्हाIndiaभारतPoliceपोलिस