सेक्स टॉयचा वापर करुन मुलगीच करत होती लैंगिक शोषण

By Admin | Published: March 18, 2017 05:17 PM2017-03-18T17:17:09+5:302017-03-18T17:17:09+5:30

आरोपी तरुणीने प्लास्टिक, कपडे आणि फुग्याचा वापर करत एक सेक्स टॉय तयार केलं होतं

Sexual exploitation was done by the girl using sex toy | सेक्स टॉयचा वापर करुन मुलगीच करत होती लैंगिक शोषण

सेक्स टॉयचा वापर करुन मुलगीच करत होती लैंगिक शोषण

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
कोच्ची, दि. 18 - आपलं गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत असलेली व्यक्ती पुरुष नसून महिला असल्याचं लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. गेल्या दोन वर्षांपासून या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं जात होतं. शुक्रवारी तिला कळलं की आपलं लैंगिक शोषण आपल्याहून 11 वर्ष मोठ्या वयाच्या तरुणीकडून केलं जात आहे. पोलिसांनी 26 वर्षीय सिनी सियाद उर्फ सानियाला सेक्स टॉयसहित तिच्या घरातून अटक केली आहे. 
 
पीडित अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीला पुस्तकात सापडलेल्या एका कागदामुळे हा प्रकार समोर आला. या कागदामध्ये पीडित मुलीवर होत असलेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे आरोपी तरुणीनेच हे सर्व लिहून ठेवलं होतं. अपल्वयीन पीडित मुलीच्या बहिणीने तात्काळ ही गोष्ट कुटुंबियांच्या निदर्शनास आणून दिली. पालकांनी ही गोष्ट चाईल्डलाइनला कळवली त्यानंतर सायनाला अटक करण्यात आलं.
 
पीडित मुलीला गेली दोन वर्ष आपल्यावर अत्याचार करणारी व्यक्ती पुरुष असल्याचं वाटत होतं हे ऐकून पोलीस आणि चाईल्डलाईनलाही आश्चर्य वाटलं.  तपास केल्यानंतर समोर आलं की सानिया पुरुषांप्रमाणे दिसते. पीडित मुलीला सेक्सबद्दल काहीच माहिती नसल्याने ती या प्रकारामुळे घाबरलेली असायची. कदाचित यामुळे ती व्यक्ती पुरुष आहे की महिला याकडे लक्ष दिलं नसावं. 
 
आरोपी तरुणी पीडितेला धमकावत असेल. पोलीस किंव अन्य कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच तिने दिली होती. पीडित मुलीचा कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ तिने शूट करुन ठेवला होता जो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत असे. आरोपी तरुणीने प्लास्टिक, कपडे आणि फुग्याचा वापर करत एक सेक्स टॉय तयार केलं होतं. हे सेक्स टॉय कमरेला बांधून ती लैंगिक अत्याचार करत होती. पोलिसांनी तिला अटक केलं आहे.
 

Web Title: Sexual exploitation was done by the girl using sex toy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.