शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
4
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
5
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
6
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
7
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
8
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
9
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
10
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
11
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
12
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
13
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
14
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
15
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
16
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
17
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
18
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
19
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!

चिंता वाढली! देशात Black Fungus चा कहर, 18 राज्यांत तब्बल 5,424 रुग्ण; 'या' लोकांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 15:47 IST

Black Fungus Cases In India : देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा (Black Fungus) मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. देशात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

ब्लॅक फंगसला काही राज्यांमध्ये महामारी घोषित करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. 24 मे रोजी सकाळपर्यंत देशातील एकूण 18 राज्यांमध्ये म्युकोरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण 5 हजार 424 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच गुजरातमध्ये 2 हजार 165, महाराष्ट्रात 1 हजार 188, उत्तर प्रदेशात 663, मध्य प्रदेशात 519, हरियाणात 339 आणि आंध्र प्रदेशात 248 म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. 

देशात आढळलेल्या म्युकोरमायकोसिसच्या 5 हजार 424 रुग्णांपैकी 4 हजार 556 जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर 55 टक्के रुग्णांना पहिल्यापासूनच मधुमेहाची समस्या होती. 'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे. जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी हा दावा केला आहे. 

Black Fungus वर प्रभावी ठरतोय तब्बल 100 वर्षे जुना असलेला 'हा' खास फॉर्म्युला; डॉक्टरचा मोठा दावा

डॉ. अमरेंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचारामार्फत ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा उपाय म्हणजे मिथलीन ब्लू. डॉ. पांडे यांच्या मते हे औषध अँटीफंगलचं काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होतं. पण या औषधाचा वापर करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचवणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्यूब वारंवार स्वच्छ करत राहायला हवी. यामळे फंगस निर्माण होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहतो असं पांडे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMucormycosisम्युकोरमायकोसिसDeathमृत्यू