प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:03 IST2019-01-31T15:32:47+5:302019-01-31T16:03:51+5:30
सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे.

प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपाकडून काँग्रेसला धोबीपछाड, जिंद विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच फुलले कमळ
जिंद ( हरियाणा) - सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपानेकाँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. जिंद विधानसभा मतदासंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे कृष्णलाल मिश्रा यांनी 12 हजार 935 मतांनी विजय मिळवला आहे. कृष्णलाल मिढ्डा यांना 5 हजार 566 मते मिळाली. जननायक जनता पार्टीचे दिग्विजय सिंह चौटाला 37 हजार 631 मतांसह दुसऱ्या स्थानी राहिले. तर काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना 22 हजार 740 मतांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
जिंद विधानसभेची निवडणूक राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. भाजपाने येथून हरिचंद मिढ्ढा यांचे पुत्र कृष्णलाल मिढ्ढा यांना उमेदवारी दिल्ली होती. तर काँग्रेसने राज्यातील दिग्गज नेते रणदीप सुरजेवाला यांना मैदानात उतरवण्याची खेळी केली होती. तर नव्याने उदयास आलेल्या जननायक जनता पार्टीने दिग्विजय सिंह चौटाला उमेदवारी दिली होती.
BJP's Krishan Lal Middha wins #JindByPollResults with a margin of 12935 votes, garnering a total of 50566 votes. JJP's Digvijay Singh Chautala garners 37631 votes and Congress' RS Surjwala gets 22740 votes. pic.twitter.com/9QpI10OCLj
— ANI (@ANI) January 31, 2019
विशेष बाब म्हणजे या मतदारसंघात आतापर्यंत भाजपाला विजय मिळवला आला नव्हता. अखेर आज भाजपाने या मतदारसंघात भाजपाने आपले खाते उघडले. दरम्यान, विजयानंतर कृष्णलाल मिढ्ढा म्हणाले की, '' ज्यांनी मला आणि माझ्या पक्षाला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो. या निवडणुकीत मोठे नेते आमच्या विरोधात उभे होते. मात्र आम्ही त्यांनाही पराभूत केले.''
BJP's KL Middha after winning #JindByPoll: I would like to thank everyone who supported the party&me. It's their victory. There were big leaders in the contest as well, but we have defeated them too. We will follow the schemes launched by PM and take them forward. #Haryanapic.twitter.com/QaZgcSzblJ
— ANI (@ANI) January 31, 2019
तर काँग्रेस उमेदवार रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या पराभव मान्य केला आहे. आता मनोहरलाल खट्टर आणि कृष्णलाल मिढ्ढा हे जिंद येथील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असे सुरजेवाला म्हणाले.
Randeep Surjewala on Jind bypoll result: I hope Manohar Lal Khattar and Krishna Middha ji will fulfil the dreams of the people of Jind. I was given a responsibility by the party which I fulfilled to the best of my abilities, I congratulate Krishna Middha ji. pic.twitter.com/O97opemVsY
— ANI (@ANI) January 31, 2019