शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फेसबुक युजर्सना आकर्षित करण्यासाठी भाजपचा सर्वाधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 3:13 AM

लोकसभा निवडणुकीत मतदारांंना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष चढाओढीने सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. तथापि, सोशल मीडियावरील जाहिरातीसाठी भाजप सर्वाधिक खर्च करीत आहेत

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मतदारांंना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष चढाओढीने सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. तथापि, सोशल मीडियावरील जाहिरातीसाठी भाजप सर्वाधिक खर्च करीत आहेत. फेसबुकच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप आणि पंतप्रधानांसाठी ६.६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

भाजपने २० एप्रिलपर्यंत फेसबुकवर जाहिरातींसाठी १.३२ कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय भारताच्या ‘मन की बात’साठी२.२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माय फर्स्ट वोट टू मोदी यावर १.०८ कोटी, नॅशन विद नमो यावर १.२० कोटी रुपये, तर नमो मर्केन्डायझिंग यावर ५.७२ लाख रुपयांच्या ४८ जाहिराती दिल्या आहेत. याशिवाय नमो सपोर्टस्ने १.९७ लाख रुपये खर्च केले आहेत. भाजपच्या राज्य शाखांही फेसबुकवरील जाहिरातींसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत ३०३ जागांसाठी मतदान झाले. यासाठी भाजप आणि भाजपच्या समर्थनार्थ १६ हजारांहून अधिक जाहिराती देण्यात आल्या होत्या. याच अवधीत काँग्रेसने ५५.६८ लाख खर्च करून २२०२ आणि युवक काँग्रेसने ११४ जाहिरातींवर ६.०३ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांनी १६८ जाहिरातींवर ४७.२३ लाख रुपये खर्च केले. तसेच जेडीयूचे प्रशांत किशोर यांच्या आय-पॅकने ४७९ जाहिरातींवर ४६.३७ लाख रुपये करण्यात आले आहेत. तेलगू देसमने १२.९५ लाख रुपये खर्च फेसबुकवर २५ जाहिराती दिल्या. शिवसनेनेही या अवधीत ५४ जाहिरातींवर ३.१६ लाख रुपये, एनसीपीने २३५ जाहिरातींवर २.९५ लाख रुपये खर्च केले.

ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या तुलनेत फेसबुक लोकांना प्रभावित करण्यात अधिक उपयुक्त आहे, असे राजकीय आणि सोशल मीडियाच्या जाणकारांना वाटते. त्यामुळे राजकीय पक्ष फेसबुकलाच सर्वाधिक महत्त्व देत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया