शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

अंगावर धावले भाजपचे कार्यकर्ते; गुन्हे दाखल झाले आंदोलक शेतकऱ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 5:46 AM

दिल्लीच्या विविध सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० पासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या विविध सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० पासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सात महिन्यांपासून आंदोलन सुरू असलेल्या गाझीपूर येथील शेतकऱ्याच्या व्यासपीठापर्यंत भाजपचे कार्यकर्ते पोहोचले. यात कार्यकर्ते आणि दोघांत झटापट झाली. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दिल्लीच्या विविध सीमांवर २६ नोव्हेंबर २०२० पासून कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरू आहे. बुधवारी गाझीपूर सीमेवर भाजप आणि शेतकरी आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले. या प्रकरणी गाझीपूर पोलिसांनी कारवाई करत भाकियुच्या २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला. भाजप नेते अमित वाल्मीकी यांनी केलेल्या तक्रारीत भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. 

nभाजपच्या काही कार्यकर्त्यांच्या वाहनांची तोडफोडही झाली होती. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यासपीठाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. राकेश टिकैत यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली, परंतु शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याने पोलिसांवर राजकीय दडपण आणले गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी