VIDEO : पोलिसांची कॉलर पकडून भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 21:10 IST2019-01-21T21:07:59+5:302019-01-21T21:10:45+5:30

ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये निदर्शने करणाऱ्या भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक होऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. या दरम्यान महिला आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. 

BJP women workers scuffle with police over Pipili rape and murder case | VIDEO : पोलिसांची कॉलर पकडून भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की 

VIDEO : पोलिसांची कॉलर पकडून भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की 

भुवनेश्वर: ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये निदर्शने करणाऱ्या भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक होऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. या दरम्यान महिला आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. 

पीपली बलात्कार आणि खूनप्रकरणी भाजपाच्या महिला विभागाकडून भुवनेश्वरमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांवरच हात उगारला. तसेच, या महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांची कॉलर पकडली. यावेळी पोलिसांनीही त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले.


दरम्यान, भाजपा महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांच्यामध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे परिसरात काहीकाळ तणाव पसरला होता. याचबरोबर, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: BJP women workers scuffle with police over Pipili rape and murder case