शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

बिहारसह 10 राज्यांत #ModiSuperWave; लॉकडाउनच्या त्रासाचं रुपांतर मोदी प्रेमात का झालं?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 11, 2020 16:40 IST

येथे एक गोष्ट जाणणे अत्यंत महत्वाचे आहे, की लोक कोरोना व्यवस्थापन आणि लॉकडाउनसंदर्भात मोदींसोबत आहेत? हा प्रश्न यासाठी आवश्यक आहे, की बिहारसह संपूर्ण देशातील काही लोक भाजपच्या विजयामुळे हैराण आहेत.

ठळक मुद्देउत्तर प्रदेश ते नगालँडपर्यंत 10 राज्यांच्या पोट निवडणुकीत भाजपची चकाकी वाढवण्यात पुन्हा एकदा मोदींच्या करिष्म्याने कमाल केली.भाजपच्या या विजयानंतर सोशल मीडियावरही 'मोदीची लाट' आली आहे.10 राज्यांत पोट निवडणुका, 67% जागांवर भाजपचा कब्जा -

नवी दिल्ली -बिहार निवडणुकीत भोवऱ्यात अडकलेली नितीश कुमारांची नाव तटाला लावण्यापासून, उत्तर प्रदेश ते नगालँडपर्यंत 10 राज्यांच्या पोट निवडणुकीत भाजपची चकाकी वाढवण्यात पुन्हा एकदा मोदींच्या करिष्म्याने कमाल केली. भाजपच्या या विजयानंतर सोशल मीडियावरही 'मोदीची लाट' आली आहे. ट्विटरवर #PmModiSuperWave ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगच्या माध्यमाने लोक या विजयाचे संपूर्ण श्रेय मोदींना देत आहेत.

येथे एक गोष्ट जाणणे अत्यंत महत्वाचे आहे, की लोक कोरोना व्यवस्थापन आणि लॉकडाउनसंदर्भात मोदींसोबत आहेत? हा प्रश्न यासाठी आवश्यक आहे, की बिहारसह संपूर्ण देशातील काही लोक भाजपच्या विजयामुळे हैराण आहेत. त्यांनी, कोरोनामुळे लोकांना कराव्या लागलेल्या स्थलांतराचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत, बिहारचे लोक या काबीलच आहेत. सुरभी शर्मा आणि अफ्फू यांनी ट्विट करत "प्रिय बिहारी, आपण सर्व यास पात्र आहात," असे म्हटले आहे.

बिहारनं जगाला लोकशाहीचा पहिला धडा शिकवला; निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदींनी केलं असं ट्विट

बिरहारमध्ये दिसला भाजपचा दम...भाजपने बिहारमध्ये 66.4 टक्के स्ट्राइक रेटने 74 जागा जिंकल्या आहेत. तर आरजेडीने 75 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, आरजेडीने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, त्यांचा स्ट्राइकरेट भाजपपेक्षा तब्बल 14 टक्के कमी म्हणजे 52.8 टक्के एवढा आहे. तर एनडीएतील जेडीयूचा स्ट्राइक रेट केवळ 37.4 टक्के एवढाच आहे. त्यांनी 43 जागा जिंकल्या आहेत.

10 राज्यांत पोट निवडणुका, 67% जागांवर भाजपचा कब्जा -केवळ बिहारमध्येच नाही, तर बिहार व्यतिरिक्त इतरही 10 राज्यांतील 59 विधानसभा जागांपैकी 40 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. अर्थात त्यांना जवळपास 67.79% जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने मध्य प्रदेशात 28 पैकी 19, उत्तर प्रदेशात 7 जागांपैकी 6 आणि गुजरातमधील सर्वच्या सर्व 8 जागांवर विजय मिळवला असेल. एवढेच नाही, तर कर्नाटकात भाजपने 2 पैकी 2 तर मणिपूरमध्ये 5 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

मोदी एकटेच गेमचेन्जर!पंतप्रधान मोदी हे देशाचे एकटे गेमचेन्जर आहेत, असे राम अहिर यांनी म्हटले आहे, त्यांनी लिहिले आहे, की 'पीएम मोदी हे एकमेव गेमचेन्जर आहेत.'

'आणखी दिसत राहणार मोदी लाट'तुफान करन यांनी दावा केला, की येणारी काही वर्षे अशाच प्रकारची मोदी लाट पाहायला मिळेल. '18 वर्ष आणि काउंटिंग. भूतकाळातील कोणताही राष्ट्रीय नेता एवढ्या दीर्घकाळ लोकप्रिय राहिलेला नाही. चांगली गोष्ट, ही की असे आणखी अनेक वर्षे जाणार आहेत.

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

लॉकडाउन काळातील त्रास का विसरले मतदार? बिहारमध्ये झालेल्या एनडीए विजयामुळे विरोधक अत्यंत दुःखी आहेत. येथील मतदार लॉकडाउन काळातील त्रास एवढ्या लवकर आणि एवढ्या सहजपणे कसे विसरले? हेच त्यांना कळेनासे झाले आहे. पण खरेतर, मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या ऐतिहासिक कामांचीच ही फलश्रृती आहे, असे म्हणावे लागेल. या काळात मोदींनी केलेली अशी काही ऐतिहासिक कामे आहेत, ज्यांच्यापुढे लोकांचा झालेला लॉकडाउनचा त्रासही तोटका पडला. ही कामे लोकांसाठी अत्यंत सरस आणि महत्वाची ठरली. मोदींनी कोट्यवधी गरिबांना उघडून दिलेली जनधन खाती, सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच कोरोना काळात गरिबांना मोफत धान्य पुरवणे, अशा अनेक कामांचा जनतेवर मोठा परिणाम झाला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस