Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 06:41 PM2020-11-10T18:41:56+5:302020-11-10T18:48:32+5:30

भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता.

Bihar Assembly Election Result sanjay tiger give creadit devendra fadanvis for bihar bjp victory | Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये वाजतोय फडणवीसांचा डंका! भाजपनं सांगितलं कसा झाला फायदा?

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती.जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा उत्तमरित्या सांभाळली. यामुळे भाजपला घवघवीत यश मिळाले, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला आहे. सध्या एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यातच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला. असे बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी म्हटले आहे. असे म्हणत, बिहार मधील या यशाचे श्रेय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

टायगर म्हणाले, “बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला. पक्षाची बाजू मांडली तसेच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर त्यांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”, असे बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी म्हटले आहे.

मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा

भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. जबाबदारी मिळताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करील. या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते.

फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा उत्तमरित्या सांभाळली. यामुळे भाजपला घवघवीत यश मिळाले, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

बावनकुळेंनीही फडणवीसांना दिले बिहार मधील यशाचे श्रेय - 
“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपने संघटन उभारले आणि पाच वर्षांत जे काम झाले. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले आहे.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारण

भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी फडणवीसांना दिले बिहार यशाचे श्रेय -
बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच यश आणि विजयाचे श्रेय भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला. मात्र, निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते मुंबईत परतले होते. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात दिली. दरम्यानच्या, काळात निवडणूक प्रचाराची सांगता झाली. मात्र, फडणवीस यांनी आपली जबाबदारी निभावली होती. फडणवीस यांच्या रणनितीचं आणि नेतृत्वाच हे यश असल्याचं भाजपचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. 

Web Title: Bihar Assembly Election Result sanjay tiger give creadit devendra fadanvis for bihar bjp victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.