शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

...तर स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार माणसं मिळणार नाहीत, राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 9:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते...

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्यानंतरही भाजपाची नेतेमंडळी सुधण्याचे नाव घेत नाहीये. भाजपांच्या नेत्यांचा वाचाळपणा कायम असून, आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 2019नंतर राहुल गांधींना स्मशानात पोहोचवण्यासाठीही चार लोक मिळणार नाहीत, असे वक्तव्य चौबे यांनी केले आहे. चौबे यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अश्विनी चौबे यांनी बाबतपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राहुल गांधींनी 15 मिनिटे बोलण्याची संधी देण्याच्या मोदींना दिलेल्या आव्हानावरून राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेर आहेत. आता राहुल गांधींनी सव्वाशेर बनण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेस अध्यक्ष लोकसभेमध्ये गप्प बसून असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसते. पुढच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एक सशक्त आणि भक्कम असे रालोआचे सरकार बनेल. तर काँग्रेस चारीमुंड्या चीत होईल. त्यानंतर काँग्रेस पक्षाला स्मशानात घेऊन जाण्यासाठीही चार जण मिळणार नाहीत."

राहुल गांधी यांनी गरिबी पाहिलेली नाही. तसेच राहुल गांधींच्या खानदानाने महिलांचे किती शोषण केले आहे ते सुद्धा त्यांना ठावूक नाही आहे, असा टोलाही चौबे यांनी यावेळी लगावला.  चौबे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, वाराणसी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौबे यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.   

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकारcongressकाँग्रेसPoliticsराजकारण