शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा शिवसेनेबाबत आक्रमक होणार

By admin | Updated: March 20, 2015 01:20 IST

महाराष्ट्रात सरकारात असलेली शिवसेना सातत्याने सरकारवर टीका करत असल्याने शिवसेनेबाबतही आक्रमक भूमिका घेण्याची तयारी भाजपाने केली आहे.

राज्यभर सर्वपक्षीय ‘इनकमिंग’ : वांद्रे, तासगावच्या रिंगणातून भाजपा बाहेर, दोन आठवड्यांत प्रदेश कार्यकारिणी, प्रदेशात मोठे बदलरघुनाथ पांडे - नवी दिल्लीमहाराष्ट्रात सरकारात असलेली शिवसेना सातत्याने सरकारवर टीका करत असल्याने शिवसेनेबाबतही आक्रमक भूमिका घेण्याची तयारी भाजपाने केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेश कार्यकारिणीनंतर शिवसेनेबाबत जशास तसे धोरण राबविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. भाजपाची प्रदेश कार्यकारिणी दोन आठवड्यांत जाहीर करण्याचे आदेश शहा यांनी दानवे यांना दिले आहेत. त्यात तरुणांना अधिक वाव देण्याचे संकेत असून, मोठ्या फेरबदलाचे संकेत आहेत. शिवसेना विरोधकांची भूमिका वठवित असल्याने जनमानसात सरकारची प्रतिमा ठसत नसल्याचे लक्षात आल्याने शिवसेनेबाबत नरमाईने वागू नये, असेच बजावण्यात आले आहे. प्रथम सूचक इशारे देत सरकारचा गाडा हाकायचा आणि तरीही शिवसेनेच्या धोरणात बदल दिसणार नसेल तर आक्रमक भूमिका घ्यायची असे ठरत असल्याचे सूत्राने सांगितले. प्रदेश कार्यकारिणी दोन आठवड्यांत जाहीर झाल्यानंतर पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी सर्वपक्षीय ‘इनकमिंग’ सुरू करण्यात येणार आहे. शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते भाजपात येण्यास उत्सुक असून, महापालिका, जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत पार्टी बलवान करण्यासाठी ‘जो येईल, तो आपला’ या पद्धतीने प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत. भाजपा लढणार नाही! : तासगाव - कवठेमहांकाळ आणि मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार उभा करणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. तासगाव - कवठेमहांकाळ येथे आर.आर. पाटील आणि मुंबईतील वांद्रे पूर्व येथे प्रकाश सावंत यांच्या निधनामुळÞे निवडणूक होत आहे.